महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील कु. ऐश्वर्या वसंतराव शिंदे हिने राज्यात गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आहे.
कराड : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आलेल्या आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत आगाशिवनगर (मलकापूर) ता. कराड येथील कु. ऐश्वर्या वसंतराव शिंदे हिने राज्यात गुणवत्ता यादीत 13 वा क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आहे.
कु. ऐश्वर्या शिंदे ही मलकापूर येथील श्री. लक्ष्मीदेवी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नूतन मराठी प्राथमिक शाळेची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे. तिला शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण 300 पैकी 270 गुण म्हणजेच 90 टक्के मिळाले आहेत.
दरम्यान, तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मनोज शिंदे, मलकापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, संचालिका लताताई शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अंकुश पाटील, मुख्याध्यापक ए.व्ही. पाटील आदी. मान्यवरांनी तिचा सत्कार केला. तसेच तिचे अभिनंदन करून तिला भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
ऐश्वर्या शिंदे हिला या परीक्षेसाठी वर्गशिक्षिका सौ. मनीषा यादव, मार्गदर्शक शिक्षिका सौ. सीमा वीर, सौ. ए.पी. पाटील, सौ. रूपाली शिंदे, सौ. धनश्री देसाई, सौ. मानसी नायकवडी यांनी विशेष मार्गदर्शन केले.


