maharashtra

गोडोली परिसरातून दुचाकीची चोरी


Two-wheeler stolen from Godoli area
सातारा येथील गोडोली परिसरातून वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सातारा येथील गोडोली परिसरातून वीस हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राजू श्रीरंग मोरे (वय ५५, रा. १९0 अ, प्लॉट नंबर ५, मौर्य हाईट्स, गोडोली, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच ११ - एई १८९९) घरासमोरील रस्त्यावर पार्क केली होती. मात्र, दि. ९ जानेवारी रोजी रात्री नऊ ते दि. १0 रोजी सकाळी दहा या वेळेत कोणीतरी ती चोरुन नेली. याबाबतची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक वाघमारे करत आहेत.