काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गावगुंडासारखे, गांजाड्या नानांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आक्रमक होऊन भाजपा कार्यकर्त्यांनी पोवई नाका येथे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले.
मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. याबाबत नागरिकांकडून अनेकदा पालिका व पोलिसांना निवेदने देण्यात आली. होती. त्यानुसार मलकापूर पालिका व शहर पोलीस प्रशासनाने सेवा रस्त्यांवर 'नो पार्किंग झोन' जाहीर केला असून सोमवारपासून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसही पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
वाळू, माती व मुरुम वाहतूकीसाठी तहसिलदारांना सागून परवानगी मिळवून देण्यासाठी राणंद, ता. माण येथील कोतवाल कृष्णदेव उर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय34) यांनी प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदाराने 28 डिसेंबर 2021 रोजी सांगली येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.
सातारा पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत शहरातील नव्या मिळकतींना करप्रणाली लागू करण्यारोबरच विविध ५७ विषयांना मंजूरी देण्यात आली तर दोन विषय रद्द करण्यात आले.
सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत जागेच्या वाटणीवरून एकाने त्याच्या दोन मावशींवर चाकूने वार केला. सोमवारी २४ रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद शालन वसंत कांबळे (वय 55) रा. बेघर वस्ती, सैदापूर ता. कराड यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साकुर्डी, ता. कराड गावच्या हद्दीत कराड-पाटण रोडवर बेलदरे फाट्याजवळ दुचाकीला टेम्पोने धडक दिली. या अपघातात माय-लेक गंभीर जखमी झाले. रविवारी २४ रोजी ही घटना घडली.
सोनगाव सं. निंब, ता. सातारा येथे एकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात आज ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात किती महाविद्यालय सुरू झाली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
शॉर्ट टर्म कोर्स बाबत नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देणे आणि दोषी प्राचार्य मंजुश्री बोबडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रयत विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
किरपे, ता. कराड येथील राज धनंजय देवकर (वय ५) या शेतकऱ्याच्या मुलावर नुकताच बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये जखमी झालेल्या राज देवकरवर कृष्णा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च माफ करण्याचा निर्णय कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी घेतला आहे.