साकुर्डी, ता. कराड गावच्या हद्दीत कराड-पाटण रोडवर बेलदरे फाट्याजवळ दुचाकीला टेम्पोने धडक दिली. या अपघातात माय-लेक गंभीर जखमी झाले. रविवारी २४ रोजी ही घटना घडली.
कराड : साकुर्डी, ता. कराड गावच्या हद्दीत कराड-पाटण रोडवर बेलदरे फाट्याजवळ दुचाकीला टेम्पोने धडक दिली. या अपघातात माय-लेक गंभीर जखमी झाले. रविवारी २४ रोजी ही घटना घडली.
याबाबत दुचाकी चालक अनिल तानाजी ढगाले (वय 43) रा. साकुर्डी यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन फडतरे रा. उरूल ता. पाटण असे गुन्हा नोंद झालेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.


