सोनगाव सं. निंब, ता. सातारा येथे एकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सोनगाव सं. निंब, ता. सातारा येथे एकाला किरकोळ कारणावरून मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २० रोजी ११ वाजण्याच्या सुमारास सोनगाव सं. निंब येथे तेथीलच सौ. रत्नाबाई सर्जेराव लोखंडे वय ६० यांनी मुलगा हेमंत याला तुंबलेला नाला काढण्यास सांगितले. यावेळी संतोष जयसिंग लोखंडे याची दुचाकी नाल्याच्या पुढे उभी असल्यामुळे ती काढण्यास सांगितले असता त्याने चढून जाऊन हेमंत याला शिवीगाळ करून लाकडी दांडा असलेल्या कुर्हाडीने मारले. उषा संतोष लोखंडे, सायली संतोष लोखंडे यांनी त्याला हाताने मारहाण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर वरील तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.


