maharashtra

सातारा जिल्ह्यात ९७.६१ टक्के शाळा सुरू

विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याची सक्ती नाही

97.61 percent schools started in Satara district
राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात आज ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात किती महाविद्यालय सुरू झाली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.

सातारा : राज्य शासनाने परवानगी दिल्यानंतर सातारा जिल्ह्यात आज ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यात किती महाविद्यालय सुरू झाली याबाबतची माहिती रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाही. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
गेल्या आठ वर्षापासून राज्यभरात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. त्यामुळे सातत्याने लॉकडाउन, संचारबंदी निर्बंध घालण्यासह शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.  काही महिन्यांपूर्वी बंद ठेवण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या मात्र राज्यभरात सहा सातारा जिल्ह्यात कोरोना, ओमायक्रोनचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य शासनाने पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा  निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षण घेण्यात अनेक अडचणी येत असल्यामुळे पालकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त करत शाळा व महाविद्यालये सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत शिक्षण मंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वीच कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करत दि.२४ जानेवारी पासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती मात्र मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती करण्यात आली नव्हती. शिक्षण मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे पालक वर्गात स्वागत झाले होते.
शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील ३८१, जावली २४३, महाबळेश्वर ११४, वाई २५२, खंडाळा १६७, फलटण ४२२, माण ३६३, खटाव ३४४, कोरेगाव २६५, कराड ५०५, पाटण ५५७  अशा एकूण ३ हजार ७१३ म्हणजेच ९७.६१ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. ३ हजार ८०४ शाळांपैकी ३ हजार ७१३ शाळा सुरू झाल्याची अधिकृत माहिती शिक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील शाळेची एकूण पटसंख्या ४ लाख ४२ हजार ७९० एवढी आहे त्यापैकी आज ३ लाख २ हजार १५३ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. १०० टक्के उपस्थिती पैकी ६८.२४ टक्के विद्यार्थ्यांनी आज उपस्थिती लावली. सातारा जिल्ह्यात एकूण १८ हजार ५५ एवढी शिक्षण शंका असून त्यापैकी आज १७ हजार ४४२ शिक्षकांनी उपस्थित लावली. आज सकाळपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळत होता. शिक्षक विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना त्यांना सॅनिटायझर, मास्क चा वापर कसा करायचा याबाबत सूचना देत असल्याचे पाहायला मिळत होते.