महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटक महिलेचा गुरुवारी अकस्मात मृत्यू झाला. येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर आज सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्ट असल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. याबाबतची फिर्याद हॉटेल व्यावसायिक शिवराज सणस यांनी दिली. सुचित्रा अविनाश गोगर (वय ४५, रा. ठाकुर्ली, ठाणे) असे मृत महिलेचे नाव आहे.
राज्यातील पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4( नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48) वरील खंबाटकी घाटातील नव्या सहा मार्गिका बोगद्याचे (प्रत्येकी 3 मार्गिका असलेल्या जुळया बोगद्याचे) अंतिम खुदाईद्वारे खुलेकरणाचे उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपन्न झाले.
साताऱ्याच्या पत्रकारितेत स्वत:चे अनोखे वलय निर्माण केलेल्या पत्रकार मोहन मस्कर- पाटील यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी दुपारी निधन झाले. रात्री उशीरा त्यांच्या पार्थिवावर चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली या जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी या 'अक्षरक्रांती', 'पत्रयोद्ध्या'ला अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान, रक्षाविसर्जन विधी सोमवारी (दि. ३१) सकाळी ९.३० वाजता चिंचेवाडी येथे होणार आहे.
करवडी, ता. कराड येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केली. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद विकास तानाजी पिसाळ (वय 45) रा. करवडी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तब्बल अडीच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले पत्रकार मोहन मस्कर- पाटील (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला.
मलकापूर शहरात दोन-तीन वर्षांपासून नागरिकांकडून भटकी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मागणी होत होती. त्यानुसार पालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यास प्रारंभ केला असून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 5 MLD STP प्लॅट याठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला.
पोलीस दल हे शिस्तीचे खाते. या खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठा मान, सन्मान असतो. एखाद्या पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक हा त्या ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागाचा सर्वेसर्वा असतो. मात्र, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी रुजू झाल्यापासून स्मार्ट पोलिसिंग करत सर्व कर्मचाऱ्यांना एक वेगळी शिस्त व संदेशही दिला आहे.
७३ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे हस्ते जिल्हा बँकेचे ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाला. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. या दिवसापासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. भारत या दिवशी सार्वभौम प्रजासत्ताक बनला.
किरपे, ता. कराड येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात काल बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे. 26 जानेवारी रोजी पहाटे ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर वनविभागाने तात्काळ बिबट्याला ताब्यात घेत अन्यत्र हलवले आहे.
सामाजिक व माहीती अधिकार कार्यात काम करणाऱ्या महारुद्र तिकुंडे यांच्यासारखे लोकांची रेकी होणे हे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे लक्षण असून मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधीतांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे डॉ. दाभोलकर, पानसरे यांनी केलेल्या निवेदनाचा पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते तर असा घातपात झाला नस्ताआता पण प्रशासनाने या निवेदनास गांभीर्याने घेणेची गरज आहे.