७३ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे हस्ते जिल्हा बँकेचे ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाला. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. या दिवसापासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. भारत या दिवशी सार्वभौम प्रजासत्ताक बनला.
सातारा : ७३ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचे हस्ते जिल्हा बँकेचे ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात झाला. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. या दिवसापासून भारताचे लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरु झाले. भारत या दिवशी सार्वभौम प्रजासत्ताक बनला. प्रजासत्ताक देशाचे पावित्र्य आपण सर्वांनी राखलेच पाहिजे, असे उदगार याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी काढले. संविधानाने दिलेले अधिकार व त्याप्रती आपली कर्तव्ये जाणून घेऊन त्याचा आदर करणे तसेच लोकशाही बळकट करण्यासाठी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी आवाहन केले.
बँकेविषयी बोलताना ते म्हणाले, सातारा जिल्हा बँकेचे कृषी व ग्रामीण विकासात मोठे योगदान असून सर्वसामान्यांचे आर्थिक जीवन उंचावण्यात महत्वाची कामगिरी बजावत जिल्ह्याच्या कृषी व ग्रामीण विकासाची प्रमुख अर्थवाहिनी असणाऱ्या या बँकेने उत्कृष्ठ कार्यक्षमतेचे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. बँकेबद्दल जनतेमध्ये प्रचंड विश्वासार्हता आहे. बँकेची उत्कृष्ठ कार्यप्रणाली व सेवा यामुळे बँकेच्या ठेवीत भरघोस वाढ होत आहे. सातारा जिल्हा मध्य.सह.बँक भारतीय राष्ट्रीय पेमेंट निगम (एनपीसीआय) च्या युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) प्रणालीवर लिंक झालेमुळे ग्राहकांना भीम, गुगलपे, फोनपे, पेटीएम, फ्री चार्ज, जिओ मनी द्वारे खरेदी व्यवहार करणे, फोन बिल भरणे, लाईट बिल भरणे, मोबाईल रिचार्ज करणे, ई-कॉमर्स, रक्कम वर्ग करणे इत्यादि सेवा उपलब्ध झालेल्या आहेत.
बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई म्हणाले, बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून सातारा जिल्हा बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग केला आहे. बँक ३१९ शाखा व ६० एटीएम च्या माध्यमातून जास्तीतजास्त घटकांना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आहे.
या प्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या ग्रामीण विकासाच्या कार्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जिल्हा बँक आज योग्य पद्धतीने कार्यरत असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये बँकेचे उत्तम योगदान आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा असून सातारा जिल्हा बँकेने ग्राहकांना आधुनिक बँकिंगच्या सुविधा उपलब्ध करून देणेसाठी कोअर बँकिंग प्रणालीचा उपयोग केला आहे.
यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागांचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक तसेच मुख्य कार्यालयातील विविध विभागांचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.


