maharashtra

मलकापूरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिमेस प्रारंभ


Launching of Stray Dogs and Rabies Vaccination Campaign in Malkapur
मलकापूर शहरात दोन-तीन वर्षांपासून नागरिकांकडून भटकी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मागणी होत होती. त्यानुसार पालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यास प्रारंभ केला असून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 5 MLD STP प्लॅट याठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला.

कराड : मलकापूर शहरात दोन-तीन वर्षांपासून नागरिकांकडून भटकी कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मागणी होत होती. त्यानुसार पालिकेने शहरातील भटकी कुत्री पकडण्यास प्रारंभ केला असून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण मोहिम हाती घेण्यात आली आहे. 5 MLD STP प्लॅट याठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा निलम येडगे, पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्वच्छता सभापती मनेाहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, आरोग्य अभियंता प्रिया तारळेकर यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रचंड उपद्रव वाढला असून त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे व रेबीज लसीकरण करण्याची मागणी नागरिकांतून वेळोवेळी होत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांनी नागरिकांसह लहान मुलांवरही हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अनेकवेळा या विषयावर चर्चा झाली होती. तसेच याबाबत त्वरित निविदा मागवून कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
त्यानुसार मलकापूर नगरपालिकेने निर्बिजीकरण व रेबीज लसीकरणासाठी निविदा मागविण्यात आल्या. तसेच गुरुवार, दि. 27 रोजी 5 MLD STP प्लॅट याठिकाणी भटकी कुत्री पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला असून पकडलेल्या कुत्र्यांची पशुवैद्यकिय डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करण्यात येत आहे.
मलकापूर शहरातील नागरिकांनी भटकी कुत्री पकडणाऱ्या स्टाफला सहकार्य करावे. त्याचबरोबर, याबाबत काही माहिती असल्यास तात्काळ आरोग्य विभागास काळावून सहकार्य करावे, असे आवाहन मलकापूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा निलम येडगे यांनी केले आहे.