सामाजिकआणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. महारुद्र तिकुंडे यांचे ऑफिसची रेकी ..
एक महिला आणि एक पुरुष संशयीतांकडून रेकी केल्याचा संशय ..
सामाजिक व माहीती अधिकार कार्यात काम करणाऱ्या महारुद्र तिकुंडे यांच्यासारखे लोकांची रेकी होणे हे इतिहासाची पुनरावृत्ती होण्याचे लक्षण असून मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांनी वैयक्तिक लक्ष घालून संबंधीतांचा शोध घेणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे डॉ. दाभोलकर, पानसरे यांनी केलेल्या निवेदनाचा पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष घातले असते तर असा घातपात झाला नस्ताआता पण प्रशासनाने या निवेदनास गांभीर्याने घेणेची गरज आहे.
सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. महारुद्र तिकुंडे यांचे सर्व्हे नं. २३/१/१बी मध्ये गुलमोहर प्लाझा शॉप नं. ९ मध्ये त्यांचे पंचम टेलिव्हिजन नावाने ऑफिस असून या ऑफिसची दि. ०७ जानेवारी २०२२ रोजी अज्ञात एक महिला आणि पुरुष यांनी वरील इमारतीचे फोटो आणि शूटिंग केलेचे ऑफिस परिसरातील नागरिकांनी निदर्शनास आणून दिले त्यानुसार श्री. तिकुंडे यांनी मा. पोलीस अधीक्षक, सातारा यांचेकडे लेखी तक्रारी अर्ज दाखल केला आहे.
श्री. महारुद्र तिकुंडे हे शासकीय स्तरावर होणारे घोटाळे काढून त्यावर रीतसर शासन स्तरावर तक्रार अर्ज करत असतात. त्यामुळे श्री तिकुंडे यांचेवर अनेक अधिकारी, कर्मचारी नाराज असलेचे निवेदनात श्री. तिकुंडे यांनी नमुद केले आहे. या रेकी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेवर आवशक्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी समाजातील सर्व स्तरातून होत आहे.


