करवडी, ता. कराड येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केली. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद विकास तानाजी पिसाळ (वय 45) रा. करवडी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : करवडी, ता. कराड येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केली. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद विकास तानाजी पिसाळ (वय 45) रा. करवडी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शामराव अंतु भोसले, शिवराज शामराव भोसले व ओंकार शामराव भोसले (सर्व रा. करवडी ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विकास पिसाळ हे सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास शामराव भोसले यांच्या घरासमोरून जात होते. यावेळी शामराव भोसले याची मेव्हुणी सुरेखा शितोळे रा. निमसोड, यांच्याशी असलेल्या जमिन हद्दीच्या वादातून शामराव भोसले याने आपल्या दोन्ही मुलांना हाका मारून त्याला धरा, असे म्हणत शिवीगाळ केली. तसेच माझ्या मेव्हुणीला सारखा त्रास देतो, जमिन काय डोक्यावर घेऊन जाणार काय? असे म्हणून शामराव भोसले याने काठीने मारहाण करून जखमी केले. तर शिवराज याने दगडाने डोक्यात, कपाळावर मारले. तसेच ओंकार याने लोखंडी मेक डोक्यात मारून जखमी केले.
याबाबत विकास पिसाळ यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी बापलेकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.


