onebeatenupoverlandboundarydisputeinkarwadi

esahas.com

करवडीत जमिन हद्दीच्या वादातून एकास मारहाण

करवडी, ता. कराड येथे जमिनीच्या हद्दीच्या वादातून एकास तिघांनी मारहाण केली. सोमवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद विकास तानाजी पिसाळ (वय 45) रा. करवडी, ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.