Satara

esahas.com

खेड फाट्यावर दुचाकीस्वाराला लुटले

येथील खेड फाटा, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला ६२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

एडवोकेट के. व्ही. पाटील यांचे निधन

सातारा येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ व रयत शिक्षण संस्थेचे कायदा सल्लागार म्हणून काम करत असलेले एडवोकेट के. व्ही. उर्फ केशवराव पाटील (वय ८६) यांचे आज दुपारी दीड वाजता सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

esahas.com

कराडात महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांचा गोंधळ

येथील विद्यानगर परिसरातील सद्गगुरू घाडगे महाराज महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करत गोंधळ घातला. तसेच जोरदार घोषणाबाजीही केली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच गोंधळ घालणार्‍या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले.

esahas.com

सातारा पोलिसांची अवैध सावकारांविरुध्द धडक कारवाई

सातारा शहरात गत आठवड्यात एका खासगी सावकाराने एका छोट्या बाळास गहाण ठेवून घेतल्याच्या घटनेनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. त्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील खासगी, अवैध सावकारी व्यवसाय करणार्‍यांविरुध्द कडक कायदेशीर कारवाईचे निर्देश दिले होते.

esahas.com

कराड तालुक्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी आत्महत्या

तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.

esahas.com

सातारा येथून बॅटरीची चोरी

येथील मंगळवार पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिद्धनाथवाडी येथील एकावर गुन्हा

एक वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही वाई येथे फिरताना आढळून आल्याने सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील एकावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

esahas.com

दुचाकीला अडकवलेली ५० हजार असलेली बॅग चोरीस

फलटण शहरातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक फलटण राजवाडा शाखेसमोर एक अज्ञात व्यक्तीने पाठीमागे पैसे खाली पडले आहेत, असे म्हणून दिशाभूल करून पडलेले पैसे उचलत असताना मोटार सायकल हँण्डलला अडकविलेली 50 हजार रुपये रक्कम असलेली पैशांची पिशवी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

esahas.com

शेतकऱ्यास धमकी देणाऱ्या कोळकीतील खासगी सावकारास अटक

निंबळक येथील एका शेतकऱ्याला व्याजाने दिलेल्या पन्नास हजार रुपयांचे साडेतीन लाख घेऊनही सोळा लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती. पैसे न दिल्यास तारण जमिनीची विक्री करण्याची धमकी देत शिवीगाळ व दमदाटी करणाऱ्या एका खासगी सावकाराच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

esahas.com

जिल्ह्यात विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांतील सहाजण तडीपार

जिल्ह्यामध्ये विविध गुन्हे करणाऱ्या दोन टोळीतील सहा जणांना तडीपार करण्यात आले आहे. प्राधिकरण तथा जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी ही कारवाई केली असून नवीन वर्षातील ही पहिलीच मोठी कारवाई समजली जाते.