maharashtra

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिद्धनाथवाडी येथील एकावर गुन्हा


Crime against one at Siddhanathwadi for violating the order
एक वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही वाई येथे फिरताना आढळून आल्याने सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील एकावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.

सातारा : एक वर्षाकरता जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही वाई येथे फिरताना आढळून आल्याने सिद्धनाथवाडी, ता. वाई येथील एकावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सारंग ज्ञानेश्वर माने, रा. गोरेबाझार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई, ता. वाई याला पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी एका आदेशाद्वारे २५ डिसेंबर २०२१ पासून एक वर्षाकरिता जिल्ह्यातून तडीपार केले असतानाही तो दि. २७ जानेवारी २०२२ रोजी पावणेसात वाजण्याच्या सुमारास वाई, ता. वाई येथील शिवाजी चौक ते बावधन नाका जाणाऱ्या मार्गावर फिरत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस कॉन्स्टेबल श्रावण भाऊराव राठोड यांनी वाई पोलिस ठाण्यातच दिल्यानंतर त्याच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.