सातारा येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ व रयत शिक्षण संस्थेचे कायदा सल्लागार म्हणून काम करत असलेले एडवोकेट के. व्ही. उर्फ केशवराव पाटील (वय ८६) यांचे आज दुपारी दीड वाजता सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
सातारा : सातारा येथील ज्येष्ठ कायदेतज्ञ व रयत शिक्षण संस्थेचे कायदा सल्लागार म्हणून काम करत असलेले एडवोकेट के. व्ही. उर्फ केशवराव पाटील (वय ८६) यांचे आज दुपारी दीड वाजता सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.
दोन वर्षांपासून ते पॅरालीसीसने आजारीच होते. त्यांच्या मागे विवाहित मुलगा डॉ. राहुल पाटील, सुन, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सातारा येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर राहुल पाटील यांचे ते वडील होते. सातारा येथील इस्माइलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजमध्ये त्यांनी मानद प्राचार्य म्हणुन काम पाहिले आहे. इचलकरंजी येथील समाजवादी प्रबोधीनीचे ते आजिव सभासद होते. सातारा येथे समाजवादी प्रबोधीनीचे काम वाढावे यासाठी ते सतत प्रयत्न करत असत.


