तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
कराड : तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तिघांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये मलकापूरातील लक्ष्मीकॉलनीत अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तर मलकापूरातीलच अहिल्यानगर येथे एका ५६ वर्षीय पुरुषाने राहत्या घरात फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. तसेच टेंभू येथे एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मलकापूर ता. कराड येथील लक्ष्मीकॉलनीत अल्पवयीन मुलीने राहत्या घरात लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी २८ रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबतची खबर गणपती नागनाथ माळी (वय 37) रा. मलकापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली. पायल राजेंद्र लोंढे (वय 15) रा. लक्ष्मीकॉलनी (मलकापूर) ता. कराड असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे.
तर मलकापूर येथीलच अहिल्यानगरमध्ये एकाने राहत्या घरातील हॉलमध्ये फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी २८ रोजी सकाळी 7.30 वाजणेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबतची खबर बाजीराव मारूती येडगे (वय 56) रा. अहिल्यानगर, मलकापूर यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली. राजाराम मारूती येडगे (वय 56) रा. अहिल्यानगर, (मलकापूर) ता. कराड असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक खिलारे करीत आहेत.
तसेच टेंभू ता. कराड येथे एकाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने लाकडी तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरूवारी २७ रोजी रात्री ही घटना घडली. याबाबतची खबर आप्पासो हणमंत जाधव (वय 36) रा. सुपने ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. चंद्रकांत दिनकर वर्पे (वय 58) रा. टेंभू ता. कराड असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस हवालदार गडांकुश करीत आहेत.


