maharashtra

खेड फाट्यावर दुचाकीस्वाराला लुटले

६२ हजार रुपयांची रोकड लंपास

Khed robbed the two-wheeler on the fork
येथील खेड फाटा, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला ६२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : येथील खेड फाटा, ता. सातारा गावच्या हद्दीत दुचाकीस्वाराला ६२ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ जानेवारी रोजी साडे आठ वाजण्याच्या दरम्यान येथील खेड फाटा नजीक असणाऱ्या चैतन्य टेक्सटाइल्स दुकानाच्या जवळ नितीन रघुनाथ पवार वय ३६, रा. मंगळवार पेठ, सातारा हे दुचाकी रस्त्यावर उभी करून थांबले असता काळया रंगाची विना नंबरप्लेटची दुचाकीवरून दोन इसम त्या ठिकाणी आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने त्यांचा गळा धरून तू हालचाल करू नको, नाहीतर तुला मारून टाकीन अशी धमकी देऊन त्यांच्या पॅन्टच्या खिशातून ६२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.