येथील मंगळवार पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : येथील मंगळवार पेठ परिसरातून अज्ञात चोरट्याने १५ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ डिसेंबर ते दि. ३० डिसेंबर २०२१ दरम्यान सातारा येथील मंगळवार पेठेत असणाऱ्या प्लॉट नंबर ४०८ येथे बंगल्याच्या तळमजला मध्ये असलेल्या खाजगी रुग्णालयातील वेटिंग रूममध्ये ठेवलेली १५ हजार रुपये किमतीची इंडो कंपनीची बॅटरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार डॉक्टर दिलीप मल्हाराव पाटील यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


