maharashtra

राणंद येथील कोतवालावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई


Action taken by Bribery Prevention Department at Kotwala in Ranand
वाळू, माती व मुरुम वाहतूकीसाठी तहसिलदारांना सागून परवानगी मिळवून देण्यासाठी राणंद, ता. माण येथील कोतवाल कृष्णदेव उर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय34) यांनी प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदाराने 28 डिसेंबर 2021 रोजी सांगली येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.

पुसेगाव : वाळू, माती व मुरुम वाहतूकीसाठी तहसिलदारांना सागून परवानगी मिळवून देण्यासाठी राणंद, ता. माण येथील कोतवाल कृष्णदेव उर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय34) यांनी प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार तक्रारदाराने 28 डिसेंबर 2021 रोजी सांगली येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती. त्यानुसार सांगली येथील पोलिस उपअधिक्षक सुजय घाटगे, पोलिस कर्मचारी अविनाश सागर, प्रितम चौगुले, संजय संकपाळ, भास्कर भोरे, चालक बाळासाहेब पवार यांनी तपास करुन कृष्णदेव उर्फ किसन गुजर याचे विरुध्द दहिवडी पोलिस ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या अर्जानुसार लाचलुचपत विभागाच्या कार्यप्रमाली नुसार पोलिस उपअधिक्षक सुजय घाटगे व पोलिस कर्मचारी यांनी पडताळणी केली असता या कारवाईत किसन गुजर याने तक्रारदाराकडे वाळू, माती, मुरुम वाहतूकूचा व्यवसाय तहसिलदारांना सांगून सुरु करुन देण्यासाठी प्रथम 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. चर्चेअंती 20 हजार रुपयांची मागणी करुन व्यवसाय सुरु करण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर किसन गुजर यास शंका आल्याने त्याने तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्विकारली नाही.दरम्यान पोलिस उपआयुक्त,राजेश बनसोडे, पुणे,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेअप्पर पोलिस आयुक्त सुरज गुरव, अप्पर पोलिस उपायुक्त सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षक सुजय घाटगे व पोलिस कर्मचारी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु केली आहे.पुढील तपास सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेउपअधिक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. गिरी करत आहेत. लाच मागणी संदर्भानेतक्रारी असल्यास पोलिस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा येथेअथवा, कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक02162-238139 वर तसेच हेल्पलाईल क्रमांक 1064 वरतसेच व्हॉटसअप क्रमांक 7875333333 व मोबाईल क्रमांक 8975651262 येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.