सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत जागेच्या वाटणीवरून एकाने त्याच्या दोन मावशींवर चाकूने वार केला. सोमवारी २४ रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद शालन वसंत कांबळे (वय 55) रा. बेघर वस्ती, सैदापूर ता. कराड यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कराड : सैदापूर ता. कराड गावच्या हद्दीत जागेच्या वाटणीवरून एकाने त्याच्या दोन मावशींवर चाकूने वार केला. सोमवारी २४ रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद शालन वसंत कांबळे (वय 55) रा. बेघर वस्ती, सैदापूर ता. कराड यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शालन वसंत कांबळे व नंदा लक्ष्मण माने रा. विहापूर ता. कडेगाव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. तर सुनिल प्रकाश बनसोडे असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सैदापूर येथे कुंदा प्रकाश बनसोडे हिने जागेच्या वाटणीसंदर्भात चर्चा करण्यासाठी दोन बहिणींना बोलविले होते. त्यावेळी फिर्यादी शालन वसंत कांबळे व नंदा लक्ष्मण माने रा. विहापूर, ता. कडेगाव या तेथे आल्या होत्या. वाटणीसंदर्भात चर्चा चालू असताना सोमवारी दुपारी 1.30 वाजणेच्या सुमारास फिर्यादी शालन ह्या सुनिल यास तुझ्या हिस्स्यातील जागा तु विक, आमच्या हिश्यातील जागेत लक्ष घालू नको, असे सांगितले.
त्यावेळी सुनिल याने चिडून जाऊन घरात असलेल्या चाकूने नंदा हिचे अंगावर धावून गेला. तसेच शिवीगाळ करून हातातील चाकूने नंदा हिच्या मानेजवळ पाठीमागे चाकूने वार केला. यावेळी शालन ह्या सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही सुनिलने शिवीगाळ करून हातातील चाकूने कानावर वार करून जखमी केले. याबाबत शालन कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल बनसोडे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.


