मलकापूरात नो पार्कींग झोनची प्रभावी अंमलबजावणी
पोलीस प्रशासन एक्शन मोडवर : सेवा रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. याबाबत नागरिकांकडून अनेकदा पालिका व पोलिसांना निवेदने देण्यात आली. होती. त्यानुसार मलकापूर पालिका व शहर पोलीस प्रशासनाने सेवा रस्त्यांवर 'नो पार्किंग झोन' जाहीर केला असून सोमवारपासून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसही पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
कराड : मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे. याबाबत नागरिकांकडून अनेकदा पालिका व पोलिसांना निवेदने देण्यात आली. होती. त्यानुसार मलकापूर पालिका व शहर पोलीस प्रशासनाने सेवा रस्त्यांवर 'नो पार्किंग झोन' जाहीर केला असून सोमवारपासून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसही पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील सेवा रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
येथील कोल्हापूर नाक्यावरील संगम हॉटेल ते गंधर्व हॉटेल मलकापूर, तसेच कोयना वसाहत ते कोल्हापूर नाका असे राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावर वाहनांचे होणारे अस्ताव्यस्त पार्किंग, वारंवार वाहतूक कोंडी होऊन ये-जा करणाऱ्या नागरिकांसह वाहन चालकांना बऱ्याचदा नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे या समस्येवर मार्ग काढण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती.
त्यानुसार मलकापूर नगरपालिकेने राष्ट्रीय महामार्गाच्या दोनही बाजूच्या सेवा रस्त्यावर 'नो पार्किंग झोन' करण्याचा निर्णय घेतला. तसेच आज नुकतीच त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. नो पार्किंग झोनची अंमलबजावणी व कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, सपोनि राहुल वरोटे, पो.उप.नि. पतंगराव पाटील व वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, महामार्गाच्या दोन्ही बाजूस असणाऱ्या व्यापारी, रहिवाशांना या नो पार्किंग झोनबाबत काही हरकत असल्यास नगरपालिका अथवा पोलीस प्रशासनास कळविण्यात यावे, असे १८ जानेवारी रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सुचित करण्यात आले होते. या प्रस्तावास व्यापारी व नागरिकांनी सहमती दर्शवली असून आज २४ रोजी ‘नो पार्किंग झोनची’ प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
मलकापूर नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यांवर 'नो पार्किंग झोन'च्या प्रभावी अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी वाहन पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली असून पार्कींग झालेल्या वाहनावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिक, वाहनधारक, व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
- सरोजनी पाटील (वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक, कराड)