maharashtra

रयत विद्यार्थी परिषदेचे बेमुदत उपोषण सुरू


Rayat Vidyarthi Parishad starts indefinite fast
शॉर्ट टर्म कोर्स बाबत नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देणे आणि दोषी प्राचार्य मंजुश्री बोबडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रयत विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

सातारा : शॉर्ट टर्म कोर्स बाबत नेमलेल्या समितीच्या अहवालाची प्रत देणे आणि दोषी प्राचार्य मंजुश्री बोबडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी रयत विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी समिती सचिवांमार्फत नेमण्यात आली होती. त्या नेमण्यात आलेल्या समितीने एक वर्ष झाले चौकशी करून चौकशी समिती अहवाल तयार केलेला आहे. आणि त्या समितीचा अहवाल समितीचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब गायकवाड यांनी रयत शिक्षण संस्थेकडे जमा केलेला आहे आम्ही सर्व विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाविद्यालय औंध पुणे विद्यार्थी असून त्या नेमलेल्या समितीचा अहवाल आम्हास तक्रारदार म्हणून उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा तो अहवाल 11 महिने उलटून सुद्धा आम्हास देण्यात आलेला नाही आणि दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. रयत शिक्षण संस्थेचे सचिव आणि चेअरमन यांच्याकडून आम्हास कसल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही आणि आम्हास उत्तरे देखिल दिली जात नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील भ्रष्टाचारासंदर्भातील आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रयत शिक्षण संस्थेसोबत पत्रव्यवहार करीत आहोत. आमच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडत आहोत. आणि आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय समोर दोन वेळा आमरण उपोषण केले आहे. तरीसुद्धा रयत शिक्षण संस्थेकडून आम्हास कसल्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही आणि खेदाची बाब म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे सचिव शिवणकर आमच्या फोनला उत्तर सुद्धा देत नाहीत या सर्व गोष्टींमुळे नाईलाजास्तव आम्ही रयत शिक्षण संस्थेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे.