औंध, ता खटाव पोलिस ठाण्याच्या जेलच्या दरवाज्याचे टाळे तोडून दरोडेखोर पळाले होते. नुसते पळाले नाही तर जाता-जाता कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना मारहाण करूनच मोठ्या शिताफीने बाहेर पडले होते. अखेर त्यापैकी दोघांना पकडण्यास सातारा पोलीस खात्याला यश आले असून या दोन आरोपींना पुन्हा जेलची हवा खावी लागली आहे. इतरांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहेत.
आरेदरे, ता. सातारा येथे शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेमध्ये कडब्याच्या गंजी, उकिर्डे, तीन झाडे जळून भस्मसात झाली. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पवळेश्वर लिंब, ता. सातारा येथे नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नितीन गणपत निकम (वय २५, रा. पवळेश्वर लिंब, ता. सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्रतापसिंह नगर, (खेड) ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
कागल तालुक्यातील इनोव्हा कार चालकाला गाडी आडवी मारून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी सातारा येथील चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात काही फडतूस अपप्रवृत्ती बोकाळल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात नाही, असा दिवस नाही. या प्रवृत्तींनी इतके सवंग राजकारण केले आहे की त्याची पातळी पाहून त्यावर न बोललेलेच बरे, अशी सडकून टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांनी नवनीत राणा यांच्यावर पत्रकार परिषदेत केली.
सर्वसामान्य वर्गास शिक्षण द्यावे तसेच ‘रयतने स्वतःचे विद्यापीठ काढावे’ ही इच्छा अण्णांची होती.आपल्याला राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे येत्या जून २०२२ पासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ उभे राहील असा विश्वास रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा. शरद पवार यांनी व्यक्त केला.
साखर कारखान्यांच्या शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. कारखान्यांचे हंगाम संपत आले असले तरी नजिकचा ऊस तुटावा यासाठी रिकव्हरी लॉस व वाहतुकीचे अनुदान सरकारकडून दिले जात असून, ऊस उत्पादकांचा तोटा होणार नाही याची काळजी सरकार घेत असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
गावाच्या विकासात एकोपा व सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. हे वाढे गावाने दाखून दिले असून गावात चांगल्या प्रकारे विकास कामे झाली आहेत. याचा आदर्श इतर गावांनी घेऊन गावातील गट-तट विसरुन व सर्वांच्या सहकार्यातून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असूनही सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील गावे पाण्यापासून वंचित आहेत. जिल्ह्यातील पाणी अनेक प्रकारे सांगली जिल्ह्यात जात आहे. सांगली जिल्ह्यातील सर्व नेते पक्षीय मतभेद विसरून पाणी प्रश्नावर एकत्र येत असताना सातारा जिल्ह्यातील नेते एकत्र येत नाहीत. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी गावे अद्यापही वंचित आहेत.