प्रतापसिंह नगर, (खेड) ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : प्रतापसिंह नगर, (खेड) ता. सातारा येथून एक युवक बेपत्ता झाल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ में रोजी ५ वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर येथून आकाश पोपट काकडे, वय २४ राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला आहे, तो अद्याप परत न आल्याची तक्रार शोभा सुरेश काकडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


