पवळेश्वर लिंब, ता. सातारा येथे नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नितीन गणपत निकम (वय २५, रा. पवळेश्वर लिंब, ता. सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
सातारा : पवळेश्वर लिंब, ता. सातारा येथे नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नितीन गणपत निकम (वय २५, रा. पवळेश्वर लिंब, ता. सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन हा मासेमारीचा व्यवसाय करत होता. रविवारी सायंकाळी पाच वाजता नितीन हा सायकलवरून लिंबमधील रामेश्वर घाट परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात मासेमारीसाठी गेला होता. यावेळी त्याला अचानक फिट आल्याने तो नदीच्या पात्रात पडला. त्याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा क्षणात बुडून मृत्यू झाला. रात्री बराचवेळ झाला तो घरी आला नाही. त्यामुळे घरातील लोक त्याला शोधण्यासाठी नदीच्या पात्रात गेले. त्यावेळी तो पाण्यात बुडाला असल्याचे घरातल्यांना दिसून आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, सहायक फाैजदार अय्याज बागवान हे अधिक तपास करीत आहेत.


