आरेदरे, ता. सातारा येथे शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेमध्ये कडब्याच्या गंजी, उकिर्डे, तीन झाडे जळून भस्मसात झाली. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सातारा : आरेदरे, ता. सातारा येथे शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेमध्ये कडब्याच्या गंजी, उकिर्डे, तीन झाडे जळून भस्मसात झाली. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी, आरेदरे येथे शॉर्टसर्किट होऊन एक विजेची तार खाली पडल्यामुळे काही क्षणातच त्या ठिकाणी असणाऱ्या पाला पाचोळ्याने पेट घेतला. क्षणार्धात आग पसरू लागताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी, १०८ रुग्णवाहिका घेऊन चालक अमोल चव्हाण आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तात्काळ आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत या घटनेमध्ये तिन कडब्याच्या गंजी, चार उकिर्डे, तीन झाडे भस्मसात झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.


