maharashtra

औंध येथून पळालेल्या दोन दरोडेखोरांना पुन्हा जेलची हवा


The two robbers who escaped from Aundh go to jail again
औंध, ता खटाव पोलिस ठाण्याच्या जेलच्या दरवाज्याचे टाळे तोडून दरोडेखोर पळाले होते. नुसते पळाले नाही तर जाता-जाता कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना मारहाण करूनच मोठ्या शिताफीने बाहेर पडले होते. अखेर त्यापैकी दोघांना पकडण्यास सातारा पोलीस खात्याला यश आले असून या दोन आरोपींना पुन्हा जेलची हवा खावी लागली आहे. इतरांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहेत.

सातारा : औंध, ता खटाव पोलिस ठाण्याच्या जेलच्या दरवाज्याचे टाळे तोडून दरोडेखोर पळाले होते. नुसते पळाले नाही तर जाता-जाता कर्तव्य बजाविणाऱ्या पोलिसांना मारहाण करूनच मोठ्या शिताफीने बाहेर पडले होते. अखेर त्यापैकी दोघांना पकडण्यास सातारा पोलीस खात्याला यश आले असून या दोन आरोपींना पुन्हा जेलची हवा खावी लागली आहे. इतरांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जाणार आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सातारा जिल्ह्यातील औंध पोलिस ठाण्याचे जेल आहे. नव्यानेच बांधलेल्या या जेलचा दरवाजा व टाळे तोडून दरोड्या सारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपी मुकाट पळाले होते. पाच दरोडेखोरांनी जाता-जाता पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिसांना मारहाण सुध्दा केली होती. ही घटना पहाटे तीन वाजता घडली असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडल्याने सातारा पोलिस दलाची नामुष्की पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
आरोपी सचिन भोसले, राहुल भोसले, अजय भोसले, अविनाश भोसले, होमराज भोसले (सर्व रा. बीड व अहमदनगर जिल्हा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.संशयित दरोडेखोरांना नुकतेच एका गंभीर गुन्ह्यात औंध पोलिसांनी अटक केली होती. पोलिस ठाण्याच्या जेलमध्ये असल्याने त्यांना हलचल करता येत नसतानाच पळून जाण्याचा आरोपींनी प्रताप केला आहे   या घटनेची माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल नेहमीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात अलर्ट झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत. त्यातील दोन संशयित आरोपी सापडले असून उर्वरित पळून गेलेले आरोपी लवकरच पोलिसांच्या हाती लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.