maharashtra

जातीयवाद उफाळून आणला जातोय : खा. शरद पवार


Racism is being brought to a boil: Sharad Pawar
आज देशामध्ये तळागाळातल्या माणसाला अपेक्षित काय आहे ते मिळत नाही. जाती-जातीत भांडणे लावली जात आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जातीयवाद उफाळून आणला जातोय, संघर्षाचा विस्तव फुलवला जातोय. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, अशी चिंता राष्ट्रवादीचे संस्थापक अधक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

सातारा : आज देशामध्ये तळागाळातल्या माणसाला अपेक्षित काय आहे ते मिळत नाही. जाती-जातीत भांडणे लावली जात आहेत. धार्मिक तेढ निर्माण करण्याचे काम सुरु आहे. जातीयवाद उफाळून आणला जातोय, संघर्षाचा विस्तव फुलवला जातोय. यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय, अशी चिंता राष्ट्रवादीचे संस्थापक अधक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची प्रथा पद्मश्री लक्ष्मण माने यांनी सुरु केली, ती जपली आहे, असेही गौरवोद्गार पवार यांनी काढले.
जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळा येथे शाहु, फुले, आंबेडकर पुरस्कार वितरण सोहळय़ावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, पद्मश्री लक्ष्मणराव माने, ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे जे समाजाचे काम करतात त्यांचा सन्मान करण्याची परंपरा लक्ष्मण माने यांनी सुरु केली आहे. अनेकांचा सन्मान येथे करण्यात आला आहे. जे उपेक्षित वर्गासाठी लढतात त्यांच्या कामाकरता हा पुरस्कार दिला जातो. शाहु महाराजांचे मन राजमहालात रमले नाही, त्यांचे मन रमले ते गरिबांच्याबरोबर. त्यांना मुळ प्रवाहात आणण्यासाठी त्याना आरक्षण देण्यासाठी. नोकरीत 50 टक्के आरक्षण देणारा पहिला राजा म्हणून शाहू महाराज होता. महात्मा फुले हे लहान समाजात जन्मले असले तरीही त्यांचे विचार उच्च होते. मुबंई शहरात समुद्रीमार्गे यायचे असेल तर ब्रिटिश सरकारची परवानगी घ्यायला त्याकाळी लागत होती. इंग्रज राजा यायचा होता, गेटवेच्या एका कोपऱयात खेडूत होता. फेटा धोतर नेसलेला. त्यानी राजाकडे कागद दिला. राजाने तो कागद पाहिला. त्या कागदावर सर्वसामान्य शेतकऱयांची दुःखे होती. तो खेडूत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होते. शाहूसारखा राजा, फुल्यांसारखा विचारवंतांची आज देशाला गरज आहे. महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा काढली. या देशासाठी संविधान लिहिले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी. ते आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. डॉ. बाबासाहेबांनी अनेक योजना आणल्या. मुलभूत अधिकार माणसाला मिळाला पाहिजे हे त्यांनी लिहिले आहे. शेवटच्या घटकाचे महत्व त्यांनी मांडले आहे. त्यांच्या नावानं लक्ष्मण माने यांनी पुरस्कार सुरू केला. त्यामुळे बाबासाहेबांचा शिका संघटित व्हा संघर्ष करा हे ब्रिदवाक्य नेमके येथेच लागु पडते, असे सांगत त्यांनी ब्रम्हा, विष्णू, महेश घडविण्याचे काम येथे केले जाते, असे सांगत ते म्हणाले, आज समाजासमाजात तेढ निर्माण केली जात आहे. सर्वसामान्याला संघर्ष करावा लागणार आहे. पुन्हा स्वतःसाठी लढावे लागणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रोहित साळुंखे यांच्या कवितेच्या पुस्तकाचे त्यांनी कौतुक केले.
समाजात दररोज द्वेषाची पेरणी होत आहे : निखिल वागळे
निखील वागळे म्हणाले, लक्ष्मण मानेंचा फोन आला. या पुरस्कारासाठी आश्चर्य वाटलं की प्रवाहाबाहेर फेकलेल्या पत्रकाराला हा पुरस्कार देता आहात. त्यात मी काही बोलेन याचा नियम नाही त्यामुळे तुम्हाला अडचण होईल. या पुरस्कारात सन्मानाची आपुलकी भावना आहे म्हणून पुरस्कार स्वीकारतो, असे सांगत वागळे म्हणाले, फुले शाहूंच्या विचाराने राज्यात पाच संस्था चालतात त्यात ही एक आहे.  मी सध्या पत्रकारिता करत नाही याचे माझ्या मनाला बरे वाटत नाही. सध्या महागाई वाढली आहे. कोणतेही कायदे आणून छुपी आणीबाणी लादली गेली आहे. भोंग्यापेक्षा पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. मी पत्रकारिता करताना बाबरी मशिदी पाडल्याची पाहिली. मुंबईची दंगल पाहिली. परंतु आता रोजच फाळणी होताना पाहतोय. गुन्या गोविंदाने नांदत असलेला समाजात तेढ निर्माण करण्यासाठी रोज येथे द्वेषाची पेरणी होत आहे. हे थांबवलं पाहिजे माध्यमांनी. पत्रकार विदूषक झालेत, दोष माध्यमाचा नाही तर माध्यमातून काम करणारे माझ्यासारखे सरपटणारे प्राणी झालेत. या देशाचे हिंदूराष्ट्र होऊ देणार नाही, असे सांगत काश्मिर फाईल्ससारखे चित्रपट द्वेष निर्माण करतात. त्याला मी विरोध केला. आता मी येताना बोर्ड लागलेले पाहिले. ते बोर्ड होते धर्मवीर या चित्रपटाचे. कोणाला आपण धर्मवीर म्हणतो. ज्यांनी खंडणीची मागणी केली, ज्यांनी हत्या केल्या, ते नायक आहेत की खलनायक.प्रकल्प समनव्यक राजेश भोसले यांनी स्वागत केले. प्रास्ताविक लक्ष्मण माने यांनी केले.