maharashtra

शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी चौघांवर गुन्हे


Crimes against four persons in abusive and violent cases
कागल तालुक्यातील इनोव्हा कार चालकाला गाडी आडवी मारून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी सातारा येथील चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : कागल तालुक्यातील इनोव्हा कार चालकाला गाडी आडवी मारून शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी सातारा येथील चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ८  मे रोजी विजय बाजीराव मगदूम, रा. सिद्धनेर्ली ता. कागल, जि. कोल्हापूर हे खाजगी कामानिमित्त कागल येथून मुंबईकडे इनोव्हा कारमधून जात होते कार ९.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील निसर्ग धाब्यानजीक आली असता सातारा येथील आशिष मधुकर सकटे, तानाजी भिसे, गणेश सूर्यकांत नवसारे, गुरु राजेंद्र ढाणे यांनी त्यांच्या कारला गाडी आडवी मारून ती थांबविण्यास भाग पाडली. चौघेही गाडीतुन खाली उतरल्यानंतर मगदूम यांना आम्ही टीव्हीएस फायनान्स कंपनीची माणसे आहोत. तुमच्या गाडीचा हप्ता राहिला आहे असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी करून रहदारीस अडथळा निर्माण केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. वरील चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.