स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा-रहिमतपूर राज्यमार्गावर अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवथर, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्याने १० सिलेंडरच्या टाक्या चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
नवारस्ता ते मरळी जाणारे रोडवर नाडे नवारस्ता गावचे हद्दीत सांगवड पुलाजवळ दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तिघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणार्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पहार मारून खून केला आहे. या घटनेने नागझरी सह परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव वय 35 असे मृत विवाहितेचे नाव आहे. बाबू बापू जाधव वय 42 असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सातारा शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक झाले. याची दखल घेऊन सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने अतिक्रमण मोहिमेची सुरुवात हुतात्मा उद्यान परिसरातून केली. सुमारे तीन तासाच्या कारवाईमध्ये हुतात्मा उद्यानाला घेरणाऱ्या नऊ हातगाडया आणि टपऱ्या यावेळी हटवण्यात आल्या.
शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फकुडाळ येथे आज सकाळी साश्रूपुर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.
दररोजचा नाश्ता काय करावा, हा खरं तर प्रत्येक घरातल्या महिलेसमोरचा खूप मोठा प्रश्न. त्यात जर कुणी वेटलॉस करत असेल किंवा घरातल्या कुणाला शुगर असेल तर अशा सगळ्यांनाच चालेल असा आणि त्यातही पुन्हा चवदार नाश्ता बनवणं हा तर खरंच एक अवघड टास्क असतो.. म्हणूनच तर हे बघा नाश्त्याचे काही सुपर हेल्दी पर्याय (super healthy breakfast items).. अशा प्रकारचा नाश्ता असेल तर घरातले सगळेच खूश होऊन जातील..(
फलटण तालुक्यातील कापशी- आळजापूर चौक येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवार, दि.22 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
सध्या खूपच उष्ण वातावरण आहे. माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णंत: आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.