कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणार्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पहार मारून खून केला आहे. या घटनेने नागझरी सह परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव वय 35 असे मृत विवाहितेचे नाव आहे. बाबू बापू जाधव वय 42 असे संशयित आरोपीचे नाव आहे.
सातारा : कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथे मोलमजुरी करणार्या पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात लोखंडी पहार मारून खून केला आहे. या घटनेने नागझरी सह परिसरात खळबळ उडाली आहे. वैशाली बाबु जाधव वय 35 असे मृत विवाहितेचे नाव आहे. बाबू बापू जाधव वय 42 असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, मूळचा सातारा येथील असलेला बाबू जाधव हा मोलमजुरीच्या कामासाठी काही महिन्यापूर्वी पत्नी व पाच मुलांचा नागझरी येथे आला गावात मिळेल ते काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. आज सोमवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास चारित्र्याच्या संशयावरून बाबू जाधव याने पत्नी वैशाली हिला लोखंडी पहारीने मारहाण केली. या पहारीचा डोक्यात बसलेला घाव जिव्हारी लागल्याने वैशालीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान बाबू याने स्वतःलाही मारहाण करून घेतल्याची चर्चा असून तोही जखमी अवस्थेत आहे. त्याला अधिक उपचारासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कवडे यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. नेमकी घटना कशामुळे घडली याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.


