maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा


Crime in one of the cases that led to death
स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २२ रोजी ५.१५ वाजण्याच्या सुमारास म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीत पुणे-बेंगलोर मार्गावर डी मार्ट जवळ सौरव सुबोध करंदीकर रा. हुषी, ता. देवगड याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून छोटा हत्ती टेम्पो चालवून झालेल्या अपघातात स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.