पाण्याच्या शोधात आलेला कोल्हा विहिरीत पडला
WLPRS आणि वनपरिक्षेत्र फलटण यांनी दिले जीवदान
सध्या खूपच उष्ण वातावरण आहे. माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णंत: आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.
फलटण : सध्या खूपच उष्ण वातावरण आहे. माणसांबरोबरच प्राणीमात्रावर देखील या उष्णतेचा परिणाम होत आहे. उष्णतेमुळे बऱ्याच भागांमधील पाणी पूर्णंत: आटले आहे. त्याचा परिणाम म्हणून जंगलामध्ये पाण्याचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे प्राणी आता पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत.
अशातच दिनांक 21 मे रोजी माळे वस्ती, गिरवी, ता. फलटण येथील विकास कदम यांच्या शेतामधील विहिरीमधे कोल्हा (indian golden jackal) जातीचा वन्यप्राणी पडलेला आढळून आला. तेव्हा त्यांनी त्वरित WLPRS (wildlife protection & research society) या संस्थेच्या सदस्यांना संपर्क केला. यावेळी WLPRS आणि वनपरिक्षेत्र, फलटण यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुखरुपपणे कोल्हयाला विहिरीतुन सर्व सुरक्षा साहित्यांचा वापर करुन बाहेर काढले. तसेच त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करुन वनविभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत कोल्हयाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेऊन मुक्त केले.
असे वन्यजीव जखमी किंवा विहिरिमध्ये पडलेले आढळल्यास त्वरित WLPRS या संस्थेला किंवा स्थनिक वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी म. यू. निकम यांनी केले आहे.


