शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फकुडाळ येथे आज सकाळी साश्रूपुर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.
जावली : शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फकुडाळ येथे आज सकाळी साश्रूपुर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.
प्रथमेश पवार यांचे पार्थिव गावात आल्यावर संपूर्ण गाव गहिवरून गेला. कुडाळ येथून सकाळी आठ वाजता अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. प्रथमेश यांच्या घरी डेरेवाडी येथे घरासमोर पार्थिव आणल्यानंतर प्रथमेश यांच्या आई राजश्री पवार यांनी हंबरडा फोडला अन् उपस्थित हेलावून गेले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. “अमर रहे, अमर रहे.. प्रथमेश पवार अमर रहे” च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. संपूर्ण परिसर साश्रूनयनांनी गलबलून गेला. सकाळी १० वाजता प्रथमेश यांच्या पार्थिवाला पवार यांचे छोटे बंधू आदित्य पवार याने मुखाग्नी दिला.
सीमा सुरक्षा दलात कार्यरत असताना सेवा बजावताना जम्मू येथे गोळी लागून जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भरतीनंतर सीमा सुरक्षा दलात बेळगाव येथील प्रक्षिक्षण संपवून केवळ 3 महिन्यापूर्वीच ते जम्मू येथे लष्करात दाखल झाले होते. प्रथमेश यांच्या जाण्याने त्यांच्या गावावर आणि जावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील एक भाऊ असा परिवार आहे.


