martyrjawanprathameshpawarwascrematedinastatefuneral

esahas.com

शहीद जवान प्रथमेश पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद प्रथमेश पवार यांना बामणोली तर्फकुडाळ येथे आज सकाळी साश्रूपुर्ण नयनांनी जावलीकरांच्या वतीने अखेरचा निरोप देण्यात आला. जावली तालुक्यातून हजारोंच्या सख्येंने नागरिकांनी गर्दी करीत जावली तालुक्याच्या सुपूत्राला अखेरचा निरोप दिला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद प्रथमेश पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली.