maharashtra

ट्रकला दुचाकीची धडक; दुचाकीस्वार ठार


Two-wheeler hit by truck
फलटण तालुक्यातील कापशी- आळजापूर चौक येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवार, दि.22 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

फलटण : फलटण तालुक्यातील कापशी- आळजापूर चौक येथे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या नादुरुस्त ट्रकला दुचाकीने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना रविवार, दि.22 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, आळजापूर-कापशी येथील बस थांबा या मुख्य चौकात ट्रक क्रमांक N L 01 AE-8348 हा ट्रक सातारा बाजूकडे जात असताना शनिवारी मध्यरात्री रस्त्यावर बंद पडला. आज रविवारी दुचाकी क्रमांक MH 11 C- Y0915 शहाजी मल्हारी मिसाळ हे आपले गाव आदर्कीकडे जात असताना समोरील येणारे वाहन पाहून दुचाकीचा वेग नियंत्रण करत असताना ट्रकवर जोरात आदळल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन दुचाकीस्वार शहाजी मल्हारी मिसाळ वय 50 हे जागेवरच गतप्राण झाले.
शहाजी मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. हा नादुरुस्त ट्रक शनिवारी मध्यरात्रीपासून उभा आहे. दरम्यान पाठीमागे व पुढे याबाबत सूचना देण्यासाठी किंवा तसा दिशादर्शक असा कोणताही फलक नसल्याने ही घटना झाल्याचे बोलले जात आहे.