Satara

esahas.com

राष्ट्रवादीचे नगरसेवक भारत बोडरे यांनी लपवले तिसरे अपत्य

निवडणुकीवेळी दाखल केलेल्या शपथपत्रात केवळ दोनच अपत्य असल्याचे नमूद करून भरत बोडरे यांनी मतदारांची व शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याची तक्रार प्रतिस्पर्धी उमेदवार विश्वास अण्णा शिरतोडे यांनी लोणंद पोलिस स्टेशनला दाखल केली आहे.

esahas.com

जिल्ह्यातील शमलेल्या वादाला राज ठाकरेंकडून बत्ती!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे झालेल्या सभेत अफझल खान कबरीसंदर्भात वक्तव्य केल्याने सातारा पोलीस ऍलर्ट झाले असून प्रतापगडाच्या पायथ्याशी असणार्‍या कबरीला पोलीस संरक्षण वाढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

esahas.com

ओ.बी.सी. आरक्षणासाठी दि २५ मे रोजी भारत बंदची हाक

राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय पिछडावर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन मुक्ती पार्टी च्या समर्थनार्थ सातारा येथे विशाल प्रबोधन संमेलन पार पडले.  ओ.बी.सी.ची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे. तसेच कायमस्वरूपी आरक्षणाच्या मागणीसाठी दि. २५ मे रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.  

esahas.com

मुलं डाळ आणि भाज्या खाणं टाळतायत? मग, ‘या’ गोष्टींनी भरून काढा प्रोटीनची कमतरता

लहान मुलांना जेवणातील डाळ आणि भाजी हे पदार्थ अजिबात आवडत नाहीत. अनेकदा ते पदार्थ पाहून लहान मुलं नाक मुरडतात. अशावेळी आईला चिंता असते ती मुलांना योग्य प्रमाणात प्रोटीन कसे मिळेल याची..

esahas.com

नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड

नांदगाव, तालुका कराड येथे वनवा लावून वनसंपदेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने सुभाष शामराव पाटील यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतीची एक हजार झाडे लागवड करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. विराणी कराड यांनी हे आदेश दिले.

esahas.com

विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू

वादळी वार्‍यासह माण-म्हसवडच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या जोरदार विजेच्या कडकडाटात हिंगणी, ता. माण येथील शुभम सरतापे या 23 वर्षीय युवकाला तसेच गोठ्यातील म्हैशीला विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

esahas.com

साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले

सातारा शहरातील सराफाच्या दुकानातून महिलेचे पंधरा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम चे सोन्याचे गंठण व तीन ग्रॅम वजनाचे मणी असा पंधरा हजाराचा मुद्देमाल अज्ञातांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या दरम्यान घडली. ही घटना वर्धमान ज्वेलर्स शनिवार पेठ येथे घडली आहे.

esahas.com

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्‍यांवर गुन्हा

वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा छळ करून तिला त्रास दिल्याप्रकरणी संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाली राहुल शिंदे वय 31 राहणार धर्मवीर नगर संभाजी नगर संपदा हौसिंग सोसायटी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

esahas.com

कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू

कांगा कॉलनी सातारा येथे 64 वर्षे वृध्दाचा घरात नारळ पाणी पिताना धाप लागल्याने अचानक मृत्यू झाला. महेश मोहनराव इथापे असे मृताचे नाव आहे. ही घटना 20 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.

esahas.com

राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी

राज्यात महाविकास आघाडी सरकार च्या नाकारते पणामुळे ओबीसी आरक्षण हिरावले गेले आहे. हा मुद्दा राज्यात मागील अनेक दिवसान पासुन पेटला असुन महाविकास आघाडी सरकार याकडे लक्ष केंन्द्रीत करत नसल्याने सातारा येथे भाजपा व ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन व रास्तारोको करुन राज्यात ओबीसी आरक्षण तात्काळ लागु करण्याची मागणी केली आहे.