maharashtra

ओ.बी.सी. आरक्षणासाठी दि २५ मे रोजी भारत बंदची हाक


OBC Call for India Bandh on May 25 for reservation
राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय पिछडावर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन मुक्ती पार्टी च्या समर्थनार्थ सातारा येथे विशाल प्रबोधन संमेलन पार पडले.  ओ.बी.सी.ची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे. तसेच कायमस्वरूपी आरक्षणाच्या मागणीसाठी दि. २५ मे रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.  

सातारा : राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय पिछडावर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने बहुजन मुक्ती पार्टी च्या समर्थनार्थ सातारा येथे विशाल प्रबोधन संमेलन पार पडले.  ओ.बी.सी.ची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे. तसेच कायमस्वरूपी आरक्षणाच्या मागणीसाठी दि. २५ मे रोजी भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.  
बहुजन क्रांती मोर्चा नेते वामन मेश्राम यांनी सांगितले की, भारत देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिम व बहुजन बांधव  एकत्रित आल्याखेरीज देशात कोणताही बदल घडणार नाही भाजप प्रणित केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या धोरणांचा त्यांनी विरोध केला .२०२० साली सी. ए. ए. व एन. आर. सी.  मंजूर झाल्यानंतर मुस्लिम समाज्याला टार्गेट करून देशात हिंदू विरुध्द मुस्लिम अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली. त्या परिस्थितीत भारत बंद सारखी आंदोलने झाल्याने सी ए व एन आर सी मंजूर होऊनही लागु झाले नाही  या प्रमाणेच आता ओ.बी.सी. आरक्षणासाठी दि २५ मे रोजी भारत बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजप केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी भाजप विरोधी सर्व राजकीय पक्षांनी २०२४ साली एकत्र आले पाहिजे.
या प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाघाटक जेष्ठ विचारवंत प्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आचार्य प्रल्हाद केशव अत्रे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महाड येथे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहतील असे ठणकावून सांगितले होते आणि हे संमेलन होण्याआधीच डॉ. आंबेडकर यांचे दि ६ डिसेंबर ५६ रोजी नवी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले. सध्या काँग्रेसला कंटाळलेल्या जनतेने भाजपचे नरेंद्र मोदी सारखा ओ बी सी हिंदू नवा चेहरा पंतप्रधान केला आहे. परंतु तेसुद्धा सत्ता मिळताच नऊ लाखाचा कोट घालून व्यवस्था उद्ध्वस्त करीत आहेत. मनसेचे राज ठाकरे यांच्या आंदोलनास पुरोगामी व जातीपाती न मानणारा हिंदू बहुजन समाजाची साथ नाही. त्यामुळे त्यांचे 'भोंगा' आंदोलन फसले आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनीही राज ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली. ज्यांची मंदिरे आहेत त्यांना त्या मंदिराचा ताबा द्या. कोणतेही काम करत नाही तरीही त्या मंदिराचा मलिदा मात्र एका विशिष्ट समूहाला मिळतो. असा ही आरोप केला. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत ओव्हाळ यांनी लाखोच्या संख्येने मराठ्यांनी मोर्चे काढूनही त्यांना मात्र आरक्षणापासून कसे वंचित रहावे लागले? याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष तुषार मोतलिंग व आभार सोमनाथ आवळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रथमेश ठोंबरे व हंबीरराव बाबर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकास माने, सागर भोसले, विश्वास गायकवाड, संजय रुद्राक्ष, विनोद लादे, अदिक इंगळे, चंद्रकांत भिसे, चेतन आवडे यांची परिश्रम घेतले. या कार्यक्रमानंतर संघटनेचे नेते वामन मेश्राम यांना दोन लाख रुपयांचा जनआंदोलन निधी देण्यात आला.