सातारा शहरातील सराफाच्या दुकानातून महिलेचे पंधरा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम चे सोन्याचे गंठण व तीन ग्रॅम वजनाचे मणी असा पंधरा हजाराचा मुद्देमाल अज्ञातांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या दरम्यान घडली. ही घटना वर्धमान ज्वेलर्स शनिवार पेठ येथे घडली आहे.
सातारा : सातारा शहरातील सराफाच्या दुकानातून महिलेचे पंधरा हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम चे सोन्याचे गंठण व तीन ग्रॅम वजनाचे मणी असा पंधरा हजाराचा मुद्देमाल अज्ञातांनी लांबवल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणे दहाच्या दरम्यान घडली. ही घटना वर्धमान ज्वेलर्स शनिवार पेठ येथे घडली आहे.
शितल रमेश पवार वय 29 राहणार पवळेश्वर तालुका जिल्हा सातारा यांनी याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ शितल पवार या जोडवी खरेदीसाठी येथील सराफाच्या दुकानांमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागील बाकड्यावर बसलेल्या दोन अनोळखी महिलांनी फिर्यादी ची नजर चुकून त्यांच्या पर्समधील चार ग्रॅम चे गंठण आणि एक ग्रॅम चे मणी पंधरा हजाराचा मुद्देमाल हातोहात लांबवला. संबंधित महिला तात्काळ निघून गेल्यानंतर फिर्यादीला आपल्या बॅगेत दागिने नसल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार दीपक पोळ अधिक तपास करत आहेत.


