वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा छळ करून तिला त्रास दिल्याप्रकरणी संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाली राहुल शिंदे वय 31 राहणार धर्मवीर नगर संभाजी नगर संपदा हौसिंग सोसायटी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सातारा : वेगवेगळ्या कारणांवरून विवाहितेचा छळ करून तिला त्रास दिल्याप्रकरणी संबंधित विवाहितेच्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सोनाली राहुल शिंदे वय 31 राहणार धर्मवीर नगर संभाजी नगर संपदा हौसिंग सोसायटी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पती राहुल शिवाजी शिंदे, सासरे शिवाजी शिंदे, व सासू शालन शिवाजी शिंदे, यांच्यावर जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे नवऱ्याने वेगवेगळ्या कारणावरून सोनाली शिंदे यांचा छळ केला तुझ्या वडिलांनी लग्नामध्ये मला कमी सोने घातले तू पसंत नव्हती मला सोडचिठ्ठी दे तसेच प्रसूती काळामध्ये झालेल्या 90 हजार रुपये खर्च माहेरा वरून आणून दे अशा वेगवेगळ्या कारणांवरून सोनाली शिंदे यांचा छळ करण्यात आला. वारंवार शिवीगाळ करून माझ्या घरात राहायचे नाही, भाड्याने खोली घेऊन राहू असे म्हणून मानसिक छळ केला. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक गुरव करत आहेत.


