राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी
योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत सातारा येथे भाजपचे राज्य सरकार विरोधात निदर्शने
राज्यात महाविकास आघाडी सरकार च्या नाकारते पणामुळे ओबीसी आरक्षण हिरावले गेले आहे. हा मुद्दा राज्यात मागील अनेक दिवसान पासुन पेटला असुन महाविकास आघाडी सरकार याकडे लक्ष केंन्द्रीत करत नसल्याने सातारा येथे भाजपा व ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन व रास्तारोको करुन राज्यात ओबीसी आरक्षण तात्काळ लागु करण्याची मागणी केली आहे.
सातारा : राज्यात महाविकास आघाडी सरकार च्या नाकारते पणामुळे ओबीसी आरक्षण हिरावले गेले आहे. हा मुद्दा राज्यात मागील अनेक दिवसान पासुन पेटला असुन महाविकास आघाडी सरकार याकडे लक्ष केंन्द्रीत करत नसल्याने सातारा येथे भाजपा व ओबीसी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार च्या विरोधात जोरदार प्रदर्शन व रास्तारोको करुन राज्यात ओबीसी आरक्षण तात्काळ लागु करण्याची मागणी केली आहे.
मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही केली आणि त्यांना आरक्षण मिळाले असुन राज्यात सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण गेले आहे. मध्य प्रदेश सरकार ने सुरुवातीला एकत्रित डेटा दिला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय डाटा देण्यास सांगितले होते. मध्य प्रदेश सरकारने तातडीने कार्यवाही करीत स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय डाटा दिल्याने तिथे ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी देण्यात आली असुन राज्यात ट्रिपल टेस्ट करण्याऐवजी परत केंद्राकडे बोट दाखवण्यात आले. त्यामुळेच आज आरक्षण गमावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट करण्याचा पहिला आदेश दि. १३ डिसेंबर २०१९ रोजी दिला होता. त्यानंतर राज्य सरकारने ट्रिपल टेस्ट पूर्ण केली असती तर आज ही वेळ आली नसती. आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होतील अशी स्थिती या सरकारमुळे आली असुन दोन वर्षांपूर्वी ट्रिपल टेस्ट केली असती तर ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले नसते. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण हिरावले गेल्याने राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याचा मागणी करिता बॉम्बे टेस्टोरट चौक सातारा येथे भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष योगेश टिळेकर, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल शिंदे यांच्या नेतृत्वात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार प्रदर्शन करुन राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण अध्यक्ष राजेंद्र इंगळे, जावळी तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, चंद्रशेखर वडणे, सचिन घाटगे, ओबीसी मोर्च्या प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार यादव, भारत जंत्रे ओबीसी सरचिटणीस, भरत देसाई, प्रमोद शिंदे, सुनिल नाकोड, नितिन शहा, प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, तेजस जमदाडे, गीता लोखंडे, वनिता पवार, वैष्णवी कदम, वैशाली टंकसाळे, प्रिया नाईक, कुंजा खंदारे, संगीता जाधव, कमल आहिरे, अनिता शिंदे, जयश्री निकम, वैशाली सावंत, विमल चव्हाण, हेमलता पोरे, जयश्री चव्हाण, सायरा काजी, शालन माने, करण पोरे, विक्रम पवार, अविनाश खर्षिकर, विक्रम बोराटे, विकास बनकर, अमोल टंकसाळे, महेंद्र कदम, गणेश पालखे, अप्पा कदम, विजय पोरे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


