maharashtra

नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड


Five thousand rupees fine
नांदगाव, तालुका कराड येथे वनवा लावून वनसंपदेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने सुभाष शामराव पाटील यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतीची एक हजार झाडे लागवड करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. विराणी कराड यांनी हे आदेश दिले.

सातारा : नांदगाव, तालुका कराड येथे वनवा लावून वनसंपदेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा शाबीत झाल्याने सुभाष शामराव पाटील यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच वेगवेगळ्या पद्धतीची एक हजार झाडे लागवड करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. विराणी कराड यांनी हे आदेश दिले.
या खटल्याची माहिती अशी, दिनांक सात जुलै रोजी नांदगाव येथील राखीव वनक्षेत्र मध्ये वनवा लागल्याचे निदर्शनास आले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा वणवा विझविला. हा वनवा सुभाष रामराव पाटील राहणार नांदगाव तालुका कराड यांनी लावल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र त्यांनी लावलेल्या आगीमुळे वनक्षेत्रातील वृक्षसंपदेचे नुकसान झाल्याची कबुली त्यांनी दिली.
दिनांक 20 मे 2012 रोजी रामराव पाटील यांना या गुन्ह्यात दोषी धरून कराड सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी अभियोक्ता रोहिणी पाटील यांनी युक्तिवाद केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पाटील यांना न्यायालयाने वृक्ष संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी पाच हजार रुपये दंड आणि वेगवेगळ्या प्रकारची एक हजार झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास कराडचे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी केला. वनपाल सुनिता जाधव, रमेश जाधव, अश्विनी पाटील, शंकर राठोड यांनी या तपासामध्ये सहकार्य केले.