कांगा कॉलनी सातारा येथे 64 वर्षे वृध्दाचा घरात नारळ पाणी पिताना धाप लागल्याने अचानक मृत्यू झाला. महेश मोहनराव इथापे असे मृताचे नाव आहे. ही घटना 20 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
सातारा : कांगा कॉलनी सातारा येथे 64 वर्षे वृध्दाचा घरात नारळ पाणी पिताना धाप लागल्याने अचानक मृत्यू झाला. महेश मोहनराव इथापे असे मृताचे नाव आहे. ही घटना 20 मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सव्वा पाच वाजता राहत्या घरात इथापे नारळ पाणी पीत असताना श्वासाचा त्रास होऊन अचानक बेशुद्ध झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टर सपकाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यांमध्ये या घटनेची खबर दिली आहे. पोलीस हवालदार ठोंबरे अधिक तपास करत आहेत.


