Satara

esahas.com

काय ते बंड... काय ते मुख्यमंत्री... काय ती शिंदेशाही...

गेली 25 वर्षे चाललेली युती 2019 ला ‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच’ या घोषणेमुळे संपुष्टात आली आणि 2019 ला मुख्यमंत्री शिवसेनेचा झाला. अडीच वर्षे शिवसेना आणि अडीच वर्षे भाजप या अटीवर कटूता आली होती. परंतू अडीच वर्षातच उद्धव ठाकरे यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावे लागले. पुन्हाही मुख्यमंत्री शिवसेनेचाच आणि तो पण भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यानेच.

esahas.com

फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

बनगर, ता. सातारा येथील एकाच्या अकाऊंट वरुन अज्ञात इसमाने 35 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा

पोलीस असल्याचा बनाव करुन दोन अनोळखी इसमांनी एकाची 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

म्हसवड येथे घरफोडी; 95 हजारांचा मुद्देमाल चोरीस

म्हसवड, ता. माण येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी करुन 95 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

जिल्ह्यातून चार दुचाकींची चोरी

सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरुन नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

esahas.com

घटस्फोट न घेता जकातवाडी येथे दुसरा विवाह करणार्‍यावर गुन्हा

खेड, ता. सातारा येथील पत्नीला घटस्फोट न देता जकातवाडी, ता. सातारा येथे दुसरा विवाह करणार्‍या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तक्रारीमध्ये पत्नीने आपला पती शारीरिक व मानसिक छळ करुन मारहाण करीत होता, असे म्हटले आहे.

esahas.com

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरडे येथील दोघांवर गुन्हा

सरडे, ता. फलटण येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

शाहू कला मंदिर ठेक्याने देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील

सातारा पालिकेच्या मंगळवारी झालेल्या प्रशासकीय सेवेत शाहू कलामंदिर ठेक्याने चालवण्याच्या विषयाला हिरवा कंदील देण्यात आला. तब्बल दोन तास चाललेल्या या सभेमध्ये 182 विषयांना मंजुरी देण्यात आली. याशिवाय घंटागाडीचा ठेका नवीन ठेकेदाराला देण्यासाठी वार्षिक दर मंजूर करून तो विषय अंतिम करण्यात आला.

esahas.com

उलटे फोटो टांगून व मिरच्यांची धुरी देऊन वडूज मध्ये सेना बंडखोरांचा निषेध

खटाव तालुक्यातील वडूज या ठिकाणी शिवसेनेचा आक्रमक चेहरा असलेले शिवसेना तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे व कट्टर शिवसैनिक युवराज पाटील, बाळासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतप्त शिवसैनिकांनी मंत्री एकनाथ शिंदे, शुभराज देसाई, आ. महेश शिंदे यांच्या फोटोला उलटे टांगून लाल मिरच्यांची धुरी दिली.

esahas.com

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठया आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात मंगळवारी आगमन झाले. पालखीचे साताऱ्यात आगमन होत असताना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना नीरा नदीपात्रात दत्त घाट येथे स्नान घालण्यात आले. नंतर पालखी लोणंदच्या बाजार तळाकडे रवाना झाली.