maharashtra

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सरडे येथील दोघांवर गुन्हा


Crime against two persons in Sarde for obstructing government work
सरडे, ता. फलटण येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : सरडे, ता. फलटण येथील ग्रामपंचायत कर्मचार्‍याला मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी तेथीलच दोघांवर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी साडेसहा वा. सुमारास सरडे ते राजाळे मार्गावर आबा नामदेव घोलप (रा. सरडे, ता. फलटण) हे ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी पाण्याच्या मुख्य वाहिनी येथे गेले असता त्याठिकाणी रोहित भीमराव जाधव, राहुल भीमराव जाधव हे दोघे पाण्याचे कनेक्शन घेत असताना आढळून आले. घोलप यांनी त्यांना पाण्याच्या मेन लाईनला कनेक्शन घेवू नका, ग्रामपंचायतीला अर्ज द्या, असे म्हटल्याच्या कारणावरुन वरील दोघांनीही त्यांना मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच दि. 27 रोजी सकाळी पुन्हा घोलप यांच्या अंगावर रोहित जाधव धावून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहा. फौ. सूर्यवंशी करीत आहेत.