पोलीस असल्याचा बनाव करुन दोन अनोळखी इसमांनी एकाची 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : पोलीस असल्याचा बनाव करुन दोन अनोळखी इसमांनी एकाची 40 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 जून रोजी 2 वा. सुमारास कातरखटाव, ता. खटाव गावच्या हद्दीत ग्रामपंचायतीसमोर दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचा बनाव करुन आठवडा बाजारात चोर्या होतात, तुमच्या हातातील अंगठ्या काढून पुडीत बांधून ठेवा, असे अण्णा सानप (रा. पडळ) यांना सांगितले. अंगठ्यांची पुडी नीट बांधून देतो, असे सांगून अंगठ्या पुडीत बांधून ती पुडी सानप यांच्याकडे दिली. मात्र, सानप यांनी पुडी सोडून पाहिली असता त्यामध्ये 40 हजार रु. किंमतीच्या दोन्ही अंगठ्या नसल्याचे निदर्शनास असल्याने त्यांनी आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार वडूज पोलीस ठाण्यात दिली. तपास पो.हवा. ओंबासे करीत आहेत.


