बनगर, ता. सातारा येथील एकाच्या अकाऊंट वरुन अज्ञात इसमाने 35 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : बनगर, ता. सातारा येथील एकाच्या अकाऊंट वरुन अज्ञात इसमाने 35 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 जून रोजी साडेतीन वा. सुमारास प्रतापगंज पेठ, सातारा येथील बँक ऑफ इंडिया येथे बाळकृष्ण मारुती लोटेकर, रा. बनगर हे आपल्या अकाऊंटवर पैसे भरण्यासाठी गेले होते. दरम्यान त्याठिकाणी एक अनोळखी इसम आला. त्याने मी तुम्हाला मदत करतो, असे म्हणाल्याने लोटेकर यांनी त्यांच्याकडे 30 हजार रुपये दिले. ते त्या अनोळखी इसमाने त्यांच्या अकाऊंटवर भरले. मात्र, एटीएम कार्ड काढून देताना त्याची अदलाबदल करुन संबंधित इसम निघून गेला. काही वेळातच त्याने लोटेकर यांच्या अकाऊंटवरुन 32 हजार 500 रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तपास सहा. फौ. साबळे करीत आहेत.


