सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरुन नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यातून चार वेगवेगळ्या ठिकाणावरुन अज्ञात चोरट्यांनी चार दुचाकी चोरुन नेल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 जून रोजी साडेचार वा. सुमारास कराड, ता. कराड येथील टाऊन हॉलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्र. एमएच 11 एएन 5055 चोरुन नेल्याची तक्रार सावकार संपत पाटील (रा. कोरेगाव, ता. कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसर्या घटनेत दि. 18 जून रोजी 2-3 वा. सुमारास मलकापूर, ता. कराड येथील सागर हॉटेलच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्र. एमएच 50 आर 1634 चोरुन नेल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
तिसर्या घटनेत दि. 24 ते 25 जून दरम्यान कोळकी, ता. फलटण येथील जीवनज्योत हॉस्पिटल परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्र. एमएच 42 एजे 1020 ही दुचाकी चोरुन नेल्याची तक्रार संतोष माणिक सोलवलकर (रा. कोळकी) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली.
चौथ्या घटनेत दि. 18 ते 19 जून दरम्यान सातारा येथील राधिका रस्त्यावर असणार्या सातार ट्रेड सेंटरच्या समोर रस्त्याकडेला पार्किंग केलेली दुचाकी क्र. एमएच 04 डब्ल्यू 4567 ही अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार अभिषेक विजय थोरात (रा. विलासपूर, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली.


