खेड, ता. सातारा येथील पत्नीला घटस्फोट न देता जकातवाडी, ता. सातारा येथे दुसरा विवाह करणार्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तक्रारीमध्ये पत्नीने आपला पती शारीरिक व मानसिक छळ करुन मारहाण करीत होता, असे म्हटले आहे.
सातारा : खेड, ता. सातारा येथील पत्नीला घटस्फोट न देता जकातवाडी, ता. सातारा येथे दुसरा विवाह करणार्या पतीवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तक्रारीमध्ये पत्नीने आपला पती शारीरिक व मानसिक छळ करुन मारहाण करीत होता, असे म्हटले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. रोहिणी रमेश शिंदे (वय 48, रा. खेड, ता. सातारा) या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, पती रमेश शंकर शिंदे याने तिला 2000 ते 26 जून 2022 दरम्यान वेळोवेळी घरगुती कौटुंबिक कारणावरुन मारहाण, शिवीगाळ तसेच मानसिक छळ केला. मुळात रमेश आणि सौ. रोहिणी यांचा घटस्फोट झालेला नसतानासुद्धा दि. 26 जून रोजी पती रमेश शिंदे याने जकातवाडी, ता. सातारा येथे शैला मोरे (रा. नुने) या महिलेशी दुसरा विवाह केला. याबाबत पती रमेश शंकर शिंदे याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पो.ना. ठोंबरे तपास करीत आहेत.


