सातारा जिल्ह्यामध्ये बुधवारपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यावर कडकडीत बंद लादण्यात आला आहे . जर कोणी पीओपीच्या मुर्त्या करताना सापडले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे पीओपी मूर्ती बनवणाऱ्या कारागीर यांना तब्बल 15 कोटी रुपयांचा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
बांधावरुन जाण्याच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केल्याने एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मिरा बाळु कांबळे रा. कोंडवे ता. सातारा असे त्यांचे नाव आहे. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
शनिवार पेठ, सातारा येथे राहत असलेली विवाहिता बेपत्ता झाल्याने तिच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्रामद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून विनयभंगाची तक्रार देण्याची धमकी देऊन पाच लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एका युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे. पाच लाखाची खंडणी मागणाऱ्या या टोळीला अवघ्या बारा तासात जेरबंद करण्यात आले.
साताऱ्यात नटराज मंदिर परिसरात अज्ञाताचा गोळी घालून खून कोणाचे कारण अद्याप अस्पष्ट संशयिताचे घटनास्थळावरून पलायन सातारा दिनांक दोन प्रतिनिधी बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी देव दर्शन करून येणाऱ्या दुसऱ्या इसमावर गोळीबार करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता भरदिवसा घडल्याने शहर परिसरात एकच खळबळ उडाली आहे सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला आहे
जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात इसमांनी दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
शेतकऱ्यांनी अद्यावत कृषी तंत्रज्ञान व कृषी विषयक इतर अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून गावातील शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी राहुल जितकर यांनी केले.
भाजपच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अंतर्गत असणार्या महिला व युवक संपर्कप्रमुख यांची आज बुधवारी सकाळी दहा वाजता पनवेल, नवी मुंबई येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास हॉलमध्ये बैठक उत्साहात संपन्न झाली.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड (केओईएल) या इंजिन्स, पॉवर जनरेटिंग युनिट्स व फार्म मॅकेनायझेशनच्या क्षेत्रातील आद्य व आघाडीच्या कंपनीने आपली के-कूल तंत्रज्ञान इंजिनांनी सुसज्ज अशी पॉवर टिलर्सची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या आपल्या दृष्टीशी व वारशाशी सुसंगती राखत कंपनीने ही श्रेणी आणली आहे.
मनोहर भास्कर यादव व नगरसेवक राजेंद्र प्रल्हाद यादव तत्कालीन मुख्याधिकारी राजेंद्र तेली व संजीवनी शंकराव दळवी यांनी शासनाची फसवणूक करून नगरपंचायतीकडे जमा झालेल्या कामगार कल्याण निधीचा अपहार केल्याप्रकरणाचा तपास करून अंतिम अहवाल दोन महिन्याच्या आत सादर करावा, असे आदेश कराड येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस एम सरोदे यांनी नुकतेच कराड पोलिसांना दिले आहेत.